पेपर डोसा

paper dosa

साहित्य :-

१)      तीन वाटया तांदूळ

२)     एक वाटी उडीदडाळ

३)     पाऊण वाटी तूरडाळ

४)     मुठभर पोहे , तेल

५)    दोन ते तीन चमचे आंबट दही

६)      चवीपुरते मीठ .

कृती :-

१)      प्रथम तांदूळ व डाळी धुऊन वेगवेगळे भिजत टाकावे .  पोहेसुध्दा भिजत टाकावेत .

२)     आठ तासानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यावे व एकत्र करावे .  त्यात मीठ व दही मिसळून ठेवावे व पीठ आंबण्यासाठी ठेवावे .

३)     पीठ आंबल्यानंतर तवा गैसवर ठेऊन चांगला तापवावा .  त्याला थोडे तेल लावून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा .

४)     नंतर त्यावर हे तयार मिश्रण पळीभरून सोडून वाटीने ते पसरावे व वर झाकण ठेवावे .  थोडया वेळाने डोसा आपोआप सुटून येईल .

५)    त्याची गुंडाळी करावी व खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यास दयावा .