साबुदाणा खिचडी

साहित्य :-sabuda12

१)      दोन वाट्या साबुदाणा

२)     एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

३)     सहा-सात हिरव्या मिरच्या

४)     चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप

५)    एक चमचा जिरं , एक चमचा लिंबाचा रस .

कृती :-

१)      साबुदाणा आठ-दहा तास भिजवावा .  साबुदाणा धुतल्यानंतर थोडं वरती दिसेल इतकं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो .

२)     तुपाची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे घालून परतावे .

३)     साबुदाण्यात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि फोडणी घालून कालवावं .

४)     हे मिश्रण दोन-तीन दिवसच ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवावं .

५)    फ्रीजमधील मिश्रण काढून कुकरमध्ये एका ताटलीवर पसरून दोन-तीन मिनिटं वाफ दिली , की खिचडी तयार होते .

६)      मायक्रोवेव्ह असेल तर दोन वाट्या मिश्रण झाकण ठेवून तीन-चार मिनिटं मायक्रो केलं तर मऊ मोकळी खिचडी तयार . ( दीड वाटी मिश्रणाची दोन प्लेट खिचडी होते . )

७)    मिश्रण फ्रीजमधून काढल्यास ते घरातल्या तापमानाला आलं की एक वाफ द्यायची .

मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा डीफ्रास्त करायचं आणि मग झकण ठेवून वाफ द्यायची