अंडा पराठा

egg paratha

 

 

 

साहित्य :-

१)      एक अंडं , एक कांदा

२)     चिमुटभर मिरपूड

३)     थोडी कोथिंबीर

४)     असल्यास अर्धा चमचा चिली गार्लिक सॉस

५)    एक कप कणीक

६)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      नेहमीप्रमाणे कणीक भिजवून घ्यावी .  त्या कणकेच्या सहा गोळ्या          करून घ्याव्यात .

२)     त्याचे फुलके लाटून घ्यावेत .  आता तव्यावर सगळे फुलके दोन्ही बाजूनं     भाजून घ्यावेत .

३)     आता एक फुलका पुन्हा तव्यावर टाकावा , थोडासा गरम झाला की उलटावा .

४)     दरम्यान अंडं फोडून त्यात सर्व मसाला घालून चांगलं फेटावं आणि ते मिश्रण   त्या फुलक्याच्या गरम बाजूवर तेल लावल्यासारखं लावावं .

५)    त्यावर दुसरा फुलका दाबून बसवावा .  अर्ध्या मिनीटानं फुलका हलक्या     हातानं उलटावा .  कडेनं चमचाभर तेल सोडावं आणि काढावा .  एकूण      तीन पराठे होतील .