अंड्याची भाजी
|
साहित्य :-
१) दोन अंडी
२) चण्याचे डाळीचं पीठ
३) तळण्यासाठी तेल
४) पीठ भिजवण्यासाठी पाणी
५) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) दोन अंडी उकडून त्याचे प्रत्येकी चार तुकडे करावे . एक वाटी चण्याच्या डाळीचे पीठ भज्यांच्या पिठासारखे भिजवावे .
२) त्यात चवीला मीठ व किंचित खाण्याचा सोडा टाकावा . अंड्याचा एक-एक तुकडा पिठात भिजवून ज्या पद्धतीने भजे तळतात त्याप्रमाणे तेलात तळून घ्यावे .
३) असे सर्व तुकडे तळावेत . चटणीबरोबर किंवा टोमाटो सॉस सोबत खावे .