अंड्याची मसाला करी
|१) चार अंडी उकडून सोललेली
२) दोन कांदे बारीक चिरलेले
३) दोन बटाट्याच्या लहान लहान फोडी
४) एक वाटी सुके किंवा ओले खोबरे
५) एक चाथुर्थांश चमचा हळद
६) एक चमचा लाल तिखट
७) अर्धा चमचा गरम मसाला पावडर
८) चवीनुसार मीठ .
ताजा गरम मसाला :-
१) दोन लवंगा
२) दोन दालचिनीचे तुकडे
३) अर्धा चमचा खसखस
४) अर्धा चमचा धने
कृती :-
१) एक टेबल स्पून तेल घालून बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यावा .
२) कांदा नरम झाल्यावर त्यात तीन ते चार वाटया पाणी टाकावे . बटाटे , हळद , लाल तिखट , गरम मसाला पावडर व मीठ टाकून शिजवावे .
३) थोडासा उभा चिरलेला कांदा तेलात भाजून घ्यावा . नंतर ताजा गरम मसाला एक-एक करून भाजावा .
४) नंतर खोबरे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे व सर्व एकत्र वाटून सांबराला लावावे .
५) दोन आमसुलांचेतुकडे करून घालावेत . अंडी मधे कापून आत सोडवीत .
६) वरून कोथिंबीर चिरून टाकावी किंवा सांबार खोबरे लावून तयार झाले की उकडलेल्या अंड्यांऐवजी कच्ची अंडी एका बाजूला एक अशी सोडवीत व वर झाकण ठेवून मंद आचेवर शिजू दयावीत .
७) या सांबारात ओले काजूगर शिजताना टाकले तर छान लागतात .
good recipes
Lai Bhari Charchrit