अंड्याचे भुजणे
|१) चार अंडी
२) चार कांदे बारीक चिरलेले
३) १/४ वाटी ओले खोबरे
४) हळद , लाल तिखट
५) गरम मसाला १/४ चमचा
६) दोन मिरच्या , आले
७) लसूण , एक डाव तूप
८) कोथिंबीर बारीक चिरून
९) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) तूप तापवून त्यात मिरची , आले , लसूण चिरून टाकावे व कांदा टाकून परतावे .
२) कांदा नरम झाला की हळद , लाल तिखट , चवीला मीठ , मसाला टाकून परतावे .
३) ऐल्युमिनीयमच्या थाळ्यात किंवा पसरट भांडयात हा कांदा काढून घेऊन सगळीकडे सारखा पसरून चार भाग करून त्याच्या प्रत्येक भागात मधे जरा खोलगट भाग करावा .
४) त्यात एक-एक अंडे फोडून टाकावे व ओव्होनमध्ये मंद आचेवर भाजावे .
५) किंवा गैसवर तवा ठेवून त्यावर अंडे ठेवून वर झाकण ठेवावे व भाजावे . वाढताना वरून कोथिंबीर टाकावी .