अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोलकर हे एकमेकांचे समान शब्द

 

narendr dabholakar

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज २० ऑगस्ट, २०१३ मंगळवार रोजी  सकाळी साडेसात वाजता पुण्यातील महर्षी शिंदे पूलावर अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली . पूलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या झाडल्या. एक गोळी त्याच्या पाठीच्या बाजूला लागली आणि एक चुकीच्या दिशेने गेली हल्लेखोरांनी दाभोळकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्यात झाडण्यात गोळ्या लागल्यामुळे दाभोळकर घटनास्थळीच कोसळले गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले हल्लेखोर ३० ते ३५ वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱयाच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले

        जादूटोणा विरोधातील कायदा व्हावा यासाठी डॉ. दाभोलकर प्रयत्नशील होते. ७ जुलै १९९५ला युती शासनाने या विधेयक मांडले होते. मात्र, गेल्या १८ वर्षांपासून मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत विधेयक रखडलेले आहे. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव- एक विहीर’ या चळवळीत नरेंद्र दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या १९८३ साली स्थापन झालेल्या ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन संमिती’मध्ये कार्य सुरू केले. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’स्थापन केली. त्यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ या एकाच विषयाला स्वत:ला आयुष्यभर बांधून घेतलं. पुढे १९८२मध्ये ते या चळवळीचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले आणि त्यातूनच १९८९मध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना डॉक्टरांच्याच पुढाकाराने झाली. या सार्‍या काळात डॉक्टरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करताना महाराष्ट्रातील गाव अन गाव पिंजून काढला. हजारो व्याख्यानं दिली. शेकडो शिबिरं घेतली. तितक्याच संख्येनं बुवाबाजी करणार्‍यांविरोधात वाद ओढवून घेतले आणि त्यांना समर्थपणे उत्तरंही दिली. असंख्य लेख आणि डझनभर पुस्तकं लिहिली.मराठी बुद्धिवादी, सामाजिक कार्यकर्ते अशी ​डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ओळख. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.

 

      संयम शिकवणारा धर्म आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला तर  कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्घोषलेली नीतीतत्वे मात्र सरपटणाऱ्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली आहेत . असे का घडत आहे, का घडवले जाते याचा विचार होण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात. व्यक्ती परतंत्र बनते. परिवर्तनाची लढाई मग अधिक अवघड बनते. म्हणूनच जनमानस शोधक, निर्भय व कृतिशील बनवून ते व्यापक परिवर्तनाच्या चळवळींसाठी तयार करावयास हवे’  हे मनापासून समजून घेणं हे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दिशेनं उचललेलं पहिलं पाऊल असेल, तेव्हा प्रत्येकानं आपण स्वत:वरचा विश्वास गमावला आहे का, ते प्रामाणिकपणे तपासून पाहण्याची गरज आहे.अघोरी अंधश्रद्धांबाबत कायदा करण्याची गरज आहे, असे  डॉ. नरेंद्र दाभोळकरांचे स्पष्ट मत होते. अंधश्रध्दा निर्मूलन आणि दाभोलकर हे एकमेकांचे समान शब्द बनून गेले होते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आज फक्त नरेंद्र दाभोळकरांचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचीच हत्या झाली, समाजातल्या त्रुटी, वाईट-चुकीच्या गोष्टी-परंपरा या विरुद्ध आयुष्यभर लढणारे डॉ. नरेंद्र दाभोळकरांसारखे अनेक थोर विचारवंत या महाराष्ट्राच्या भूमीला लाभले म्हणून तर आपण अभिमानाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा टेंभा सर्वत्र मिरवीत असतो. वैचारिक लढाई बंदुकीच्या गोळ्यावर जिंकता येते हा चुकीचा संदेश जर जायला नको असेल तर डॉ . नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी शोधून त्यांचा हत्येचा उद्देश समोर येणे अन त्यांना त्यांच्या दुष्कृत्याबाबत सजा होणे गरजेचे आहे.

 

साहित्य संपदा
अंधश्रद्धा विनाशाय -राजहंस प्रकाशन
ऐसे कैसे झाले भोंदू -मनोविकास प्रकाशन
झपाटले ते जाणतेपण -संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.
ठरलं… डोळस व्हायचंय -मनोविकास प्रकाशन
तिमिरातुनी तेजाकडे -राजहंस प्रकाशन
प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर)-राजहंस प्रकाशन
भ्रम आणि निरास -राजहंस प्रकाशन
विचार तर कराल? -राजहंस प्रकाशन
विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी -दिलीपराज प्रकाशन
श्रद्धा-अंधश्रद्धा – राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)
सौजन्य : विकीपीडिया
One Comment