अंबरनाथ शिवमंदिर

अंबरनाथ शहर हे मुंबईतील एक उपनगर आहे. या शहराला अंबरनाथ हे नाव पडलं ते याच शिवमंदिरामुळे. या ठिकाणी जागृत शिवशंकराचे स्थान आहे. अंबरनाथचं मंदिर हेमाडपंथी शैलीचे असून आत स्वयंभू शिवलिंग आहे. या मंदिराशेजारी या  ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगणारे अनेक शिलालेख आणि शिल्पे आढळतात. काळाच्या ओघात आता या मंदिराची पडझड झाली असली तरी त्याची बांधणी आजही प्राचीन काळातील इतिहासाचे पुरावे सांगत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी मोठी जत्रा भरते.  

कसे जाल – अंबरनाथ रेल्वे स्थानकावरून खाजगी अथवा सार्वजनिक वाहतुकीने या ठिकाणी जाता येतं.