अंबाडीची भाजी
|१) गोल पानाची अंबाडी चार जुडया
२) मुठभर शेंगदाणे
३) मुठभर हरभऱ्याची डाळ
४) चिरलेला गुळ लहान लिंबाएवढा
५) तांदळाच्या कण्या मुठभर (नसल्यास गव्हाचा जाड रवा)
६) ओल्या मिरच्या चार-पाच
७) लसूण आठ-दहा पाकळ्या
८) तेल , फोडणीचं साहित्य
९) चवीपुरतं मीठ .
कृती :-
१) भाजीची नुसती पानं काढून स्वच्छ धुवून एका पातेल्यात काढावी .
२) वरून शेंगदाणे व डाळ घालून कुकरला तीन शिट्टया करून शिजवून घ्यावी .
३) गार झाल्यावर पाणी पूर्णपणे निथळून एका जाड बुडाच्या पातेलीत काढून घ्यावी .
४) यात कण्या किंवा रवा घालावा . गुळ आणि भाजी शिजवून घ्यावी .
५) पळीभर तेलाची फोडणी करून त्यात मिरची व लसूण वाटून घालावं .
६) ही फोडणी भाजीवर ओतून नीट ढवळून घ्यावं .