अखेरचा लाल सलाम

sharad patilसत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील (वय ९०) यांना रविवारी सायंकाळी अखेरचा लाल सलाम देण्यात आला. सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी त्यांचे पुत्र प्रा. नचिकेत पाटील, तसेच अन्य कुटुंबिय उपस्थित होते. शनिवारी रात्री दहा वाजता दीर्घ आजाराने धुळे येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले.

रविवारी दुपारी वाडी-भोकर रस्त्यावरील त्यांच्या ‘असंतोष’ बंगल्याजवळून अंत्ययात्रा निघाली. सजवलेल्या ट्रॅक्टरवर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते. पुढे चळवळीतील कार्यकर्त्यांचा ताफा शरद पाटील जिंदाबाद अशा घोषणा देत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून आदिवासींना नामांतर चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्‍त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेयदेखील कॉ. शरद पाटील यांनाच जाते. साक्री येथे पहिले संयुक्‍त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणबिंदूवर आणण्याचे कार्य कॉ. पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केली.त्यांच्या परिवर्तनवादी विचारांना अखेरचा लाल सलाम  .