अपचन टाळण्यासाठी हे करा

images

   अपचनाच्या समस्येने अनेकांना हैराण केले आहे. अवेळी जेवण, प्रमाणाबाहेर खाणे, अपुरी झोप, उघड्यावरील पदार्थ खाणे, शिळे अथवा पचण्यास जड पदार्थ खाल्ल्यास हि समस्या उद्भवू शकते. अन्नपचन योग्य न झाल्यामुळे पोट फुगणे, दुखणे व अस्वस्थता ही लक्षणे असलेल्या विकाराला अपचन असे म्हणतात. ह्या समस्येवर काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे,

१)         भूक नसताना अति खाणे टाळावे. शिळे आणि पचण्यास जड पदार्थ वर्ज करावेत.

२)      काळजी, मनस्थापादी भावना टाळाव्यात. मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी योग व रिलॅक्सेशन थेरपीचा अवलंब करावा.

३)      नियमित वेळेवर सावकाश चावून अन्न खावे. जेवणानंतर काही वेळ विश्रांती घेणे व जरूर तर हवापालट करणे.

४)      कॉफी, काबरेनेटेड पेय, कोल्ड्रिंक, अल्कोहोलचे सेवन करू नये.

५)      अपचन झाल्यास थोडीशी बडीशेप किंवा जिरे, ताजे आले आणि कडीपत्ता, गरम पाण्यात घाला. थोडा वेळ पाणी तसेच ठेवा नंतर या पाण्यात १ पाणी घालून गाळून घ्या.