अपुरी झोप

sleepअपुरी झोपव्याधीस कारणसध्या निशाचरांचे प्रमाण वाढते आहे. कामाच्या वाढत्या वेळा आणि बदलत्या राहणीमानाने लवकर झोपण्याची शिकवणच नजरेआड केली जात आहे. सध्या लहान मुले, तरुण आणि वयस्कही उशिरापर्यंत जागताना दिसतात. पण उशिरा निजणे आणि लवकर उठण्याने शरीराला आवश्यक तो विसावा मिळत नाही. ही अपुरी झोपचं अनेक तणावांचे आणि विकारांचे कारण ठरू शकते. अमेरिकन संशोधकांनी यावर दीर्घकाळ संशोधन केले आहे. त्यांच्या मते दररोज ६ तासापेक्षा कमी झोप घेणार्‍यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित असते. त्याउलट दररोज ७ ते ८ तास झोप घेणार्‍यांना हा त्रास जाणवत नाही. या संशोधनानुसार कमी झोप घेतल्याने मधुमेह मागे लागतो त्याचबरोबर नैराश्य, जाडी, उच्च रक्तदाब आदी विकार जडण्याचीही शक्यता वाढत असल्याचेही समोर आले आहे. झोपेमध्ये दिवसभर शरीराची झालेली हानी भरून निघण्याचे काम होत असते. अपुर्‍या झोपेअभावी हानी भरून निघण्याची प्रक्रिया बाधित होते आणि त्याचे स्पष्ट परिणाम ब्लडशुगर लेवरवर पडू शकतात. हे सर्व धोके लक्षात घेता झोपण्याच्या वेळेचेही योग्य ते नियोजन असणे उत्तम.