अयोग्य आहार आरोग्यासाठी हानीकारक .
|आपण दररोज जो आहार घेतो, त्या आहारामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या सेवन केल्याने आपले आरोग्य खराब होते. त्यामुळे आरोग्याला नुकसान पोहचते.
1.हॉटेलमधील पॅक पदार्थ घरी आणून खाण्याची सवय असणे हे आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते.
2.बाहेरील तळलेल्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेले तेल तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरते. म्हणून शक्यतो बाहेरील तळलेले पदार्थ खाऊ नयेत.
3.पॅक चिप्स खाणे टाळावे यामध्ये कम्पाउंड मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळे कॅन्सर होण्याची भीती जास्त असते.
4.बाहेरील सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुमची जाडी वाढू शकते व शरीरावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात.
5.नॉनव्हेज अति सेवन आरोग्यास हानीकारक ठरू शकते.
6.फॅटी क्रीममध्ये मोठय़ा प्रमाणात फ्रॅक्टोड कॉर्न सिरप मिसळण्यात येते त्यामुळे कॅन्सर व मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.
7.बाहेरील बर्गरमध्ये जास्त प्रमाणात मिठाचा वापर केला जातो. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास होण्याची दाट शक्यता असते.
8.फिंगर चिप्समध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जाडी वाढण्याची व रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
अशा काही छोट्या-छोट्या गोष्टीमुळे आपल्या शरीराला हानी पोहचू शकते व आपले आरोग्य खराब होते. यासाठी या गोष्टीपासून दूर राहावे. हेच तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.