अरुंधती भट्टाचार्य यांची भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती….

imagesअरुंधती भट्टाचार्य यांची भारतीय स्टेट बँकेच्या नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. ३० सप्टेंबर रोजी बँकेचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्तच होते. अरुंधती भट्टाचार्य ह्या भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असणाऱ्या ‘भारतीय स्टेट बँके’च्या पहिल्याच महिला अध्यक्ष असतील. १९७७ साली स्टेट बँकेत अधिकारी म्हणून आपल्या कामाची सुरुवात करणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य सध्या बँकेच्या कार्यकारी संचालक आहेत. यापूर्वी त्यांनी स्टेट बँकेची सबसिडरी असलेल्या एसबीआय कॅप्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारीही समर्थपणे सांभाळली आहे.

     त्यांच्या अनुभवाचा आणि कर्तुत्वाचा फायदा बँक आणि बँकेच्या ग्राहकांना निश्चितच होऊ शकेल अशी आशा बाळगूया! त्यांच्या पुढील कारगिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा!