अलविदा हिंदुस्थान …!

manmohan

जागतिक दर्जाचे अर्थतज्ञ तसेच,सलग दहा वर्षे पंतप्रधानपद भूषविल्यानंतर मावळते पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सादर केला.

नवे सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची विनंती मनमोहन यांना राष्ट्रपतींनी केली आहे.

सकाळी आपल्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक बोलावून राजीनाम्यासह पंधरावी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करण्याचा निर्णय मनमोहन सिंग यांनी घेतला.

त्यापूर्वी पंतप्रधान म्हणून केलेल्या शेवटच्या भाषणात मनमोहन सिंग यांनी फाळणीमुळे बेघर झालेल्या एका मुलाला देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचविल्याबद्दल देशवासीयांचे आभार मानले. सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीने लोकशाही व्यवस्थेची पाळेमुळे अधिक घट्ट रुजली असून नव्या सरकारला त्यांनी यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपली कारकीर्द म्हणजे खुले पुस्तक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.