अल्पुझा (Alappuzha)

अल्पुझा
अलप्पी येथील बोटहाऊस – केरळ पर्यटन स्थळ

अल्पुझा हे ठिकाण ‘अल्लपी’ नावाने देखील ओळखले जाते. केरळला आल्यानंतर तुम्ही हमखास या ठिकाणी जायला हवे कारण या ठिकाणी तुम्हाला बोट हाऊसमध्ये राहता येईल.

बोटहाऊसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला खूप आधीपासून बुकींग करावी लागते. जर तुमचे बजेट फार जास्त नसेल तर तुम्ही ही घर पाहून येऊ शकता. पण या ठिकाणी तुम्हाला राहता आले तर फारच उत्तम कारण तुम्हाला केरळचे सौंदर्य या सुंदर बोटीतून छान पाहता येते.

पाहण्यासारखी ठिकाणं

अल्लपी बीच वगळता तुम्हाला या ठिकाणी अन्य काही ठिकाणही पाहता येतील. वेंबानंड बीच,मरारी बीच, पथारीमनाल बेट अशी काही ठिकाणे सुद्धा येथे आहेत.

अल्पुझामध्ये करण्यासारख्या गोष्टी

अल्पुझामध्ये तुम्हाला काही खरेदी करता आले नाही तरी निसर्गाचा आनंद घेता येईल.