अळंबी मसाला

साहित्य :-hero-300

१)      अर्धा किलो ताजी अळंबी (ताजी अळंबी आषाढी एकादशीच्या दरम्यान      मोठया प्रमाणात मिळते .  कोणतीही खाण्यालायक अळंबी चालेल ,          पण ती शक्यतो त्याच दिवशी खुडलेली असावी . 

२)     एक वाटी ताजं खवलेलं खोबरं

३)     पाव किलो कांदे , थोडी कोथिंबीर

४)     तीन मोठे चमचे तेल (तूप)

५)    सात-आठ लसूण पाकळ्या

६)      जरासं आलं , लिंबाएवढी चिंच

७)    चवीनुसार मीठ . 

मसाला :-

१)      दोन चमचे सांबर मसाला

२)     अर्धा चमचा हळद

३)     आठ काळ्या लवंगा

४)     थोडी दालचिनी

५)    जरासं जायफळ

६)      चमचाभर धने

७)    अर्धा चमचा मिरपूड . 

कृती :-

१)      कांदे लांब चिरून घ्या .  अळंबी स्वच्छ धुवून साधारण बारीक चिरून घ्या . 

२)     कढाईत तेल गरम करून घ्या .  त्यात थोडा चिरलेला कांदा परतून घ्या . 

३)     नंतर त्यातच खवलेलं खोबरं भाजून घ्या .  मिरची पूड , हळद , मिरपूड    त्यात टाकून मिश्रण चांगलं ढवळून निवत ठेवा . 

४)     गैसवर पातेलं गरम करून त्यात दोन मोठे चमचे तेल गरम करून राहिलेला   कांदा परतून घ्या . 

५)    त्यात चिरलेली अळंबी टाकून मंदाग्नीवर शिजेपर्यंत ठेवा .  अळंबी शिजली की त्यात वरचं मिश्रण पाट्यावर अथवा मिक्सरमध्ये बारीक वाटून घाला . 

६)      वाटताना त्यात चिंचेचा कोळ , कोथिंबीर पण वाटून घ्या . 

७)    तीन वाटया पाणी घालून उकळी आल्यावर मंदाग्नीवर  पाच मिनिटं ठेवा .  चवीपुरतं मीठ टाका . 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *