अळूची देठी भाजी

(अळूची चिंच-गुळाची देठी फारशी केली जात नाही .  तिची ही कृती)

साहित्य :-alu123

१)      अळूच्या देठी चार-पाच

२)     तिखट , मीठ

३)     चिंचेचा कोळ पाव वाटी

४)     गुळ , शेंगदाण्याचा कूट

५)    फोडणीचं साहित्य

६)      गोडा मसाला .

कृती :-

१)      अळूचे देठ सोलून त्याचे इंचाइंचाचे लहान तुकडे कापावेत . ते पाण्यात टाकावेत .

२)     नंतर फोडणीला टाकून अर्धवट बुडतील एवढं गरम पाणी घालावं .  फोडणीत अर्धा चमचा मेथी दाणे टाकावेत .

३)     देठ चांगले शिजले की चिंचेचा कोळ पाव वाटी , त्याच्या दुप्पट गुळ , तिखट चवीप्रमाणे मीठ , मसाला , दाण्याचं कूट सर्व कालवून त्यात ओतावं .  भाजी चांगली उकळावी .

४)     अळूचे देठ परतताना थोडीशीच फोडणी घालावी .  भाजी उकळली की हिंगाची , कढीपत्ता घातलेली फोडणी वरून घालावी व झाकून ठेवावी .  (याच भाजीत अळूच्या पानांच्या गाठी मारून फोडणीत टाकल्यासही चांगल्या लागतात .)