अशी सुटेल घोरण्याची समस्या!
|काही लोकांना झोपेत घोरण्याची सवय असते. ह्या सवयीचा त्यांना स्वतःला काही अपय होत नसला तरी इतरांची झोप मात्र यामुळे खराब होऊ शकते. मात्र झोपेत घोरणे हि सवय नसून समस्या आहे आणि त्यापासून सुटकारा हि मिळू शकतो. त्याकरीता खालील उपाय योजावेत,
१) रात्री झोपताना पाठीखाली उशी घ्यावी, मान खालीटाकावी व दोन्ही नाकपुडीत प्रकृतीप्रमाणे वचादीतेल, शतावरी तेल, ज्येष्ठमध तेल टाकावे.घोरणे कमी होईल.
२) मानेभोवती जास्त चरबी असणार्या व्यक्तींनी वेखंड, हळद व सैंधव मीठ यांचा लेप रात्री झोपण्यापूर्वीमानेभोवती लावल्यास घोरणे कमी होईल.मोठय़ा माणसांनी गळ्याच्या मध्यभागी दिसणार्याकाजूसारख्या ग्रंथीवर हळद लावावी. त्यानेही घोरणे कमी होते.
३) ज्या व्यक्तींना घोरणे तसेच कफाचा त्रास जास्तप्रमाणात आहे त्यांनी जेवणानंतर किंवा रात्री झोपतानाएक चमचा मध, पाव चमचा आल्याचा रस नियमितघ्यावा. फायदा होतो.
४) सकाळी गरम पाण्यात १/२ चमचा तिळाचे तेल टाकूनपाच मिनिटे गुळण्या कराव्यात. त्याने घोरणे कमी होते