आकर्षक असणं गरजेचं…….!

showImage.aspxआकर्षक पेहरावासाठी..पेहराव आकर्षक असणं गरजेचं आहे. आकर्षक व्यक्तिमत्त्वासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. पण पेहराव शरीरास नुकसान पोहोचवणारा नसावा याकडे लक्ष देणंही तितकंच गरजेचं आहे. बरेचदा फॅशन दिवा बनताना या महत्त्वाच्या पैलूकडे दुर्लक्ष केलं जातं. शरीरास अत्यंत घट्ट बसणारे, टोचरं कापड असणारे, सजावटीसाठी वापरलेल्या लेस, कुंदन, जदरेसी, मणी आदी सामग्री हानीकारक असल्यानं त्वचेस नुकसान संभवते. फॅशनेबल पॅटर्न करताना अथवा फॅशनेबल अँक्सेसरीज वापरताना हालचालींमध्ये सुकरता नष्ट होते. मात्र केवळ ‘फॅशनेबल राहणं’ या एकाच भावनेनं झपाटलेले लोक याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे काही गंभीर दुखणीही मागं लागू शकतात असा तज्ज्ञांचा कयास आहे.

टाईट बेल्ट, मनगटावर घट्ट बसणारा घड्याळाचा बेल्ट, स्कीन फिटींगची जिन्स, घट्ट इनर्स यामुळे त्वचेसंबंधी सोरायसिससारखे आजार जडण्याचा धोका असतो. अलीकडेच मॅचेस्टर विद्यापीठातील तज्ज्ञांनी याविषयी अभ्यास केला. यामध्ये घट्ट कपडे वापरणार्‍या लोकांना सोरायसिसचा त्रास जास्त प्रमाणात असल्याचं सिद्ध झालं आहे. घट्ट कपडे वापरताना फॅब्रिकच्या घर्षणाने अथवा त्यापासून तयार होणार्‍या रसायनांमुळे त्वचेचा वरील भाग धोक्यात येऊ शकतो.