आकर्षक नेल आर्ट

nail-artसौंदर्यसाधनेत नखांना महत्त्वाचं स्थान आहे. ट्रेंड लक्षात घेता नखं सजवण्याच्या स्टाईलमध्ये बरंच वैविध्य पाहायला मिळतं. नखं सुंदर आणि आकर्षक असणं ही व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवण्यातली महत्त्वाची बाब आहे. अलीकडे फॅशन विश्‍वात वेगवेगळे नेल आर्ट आणि वेगवेगळे नेलपेंट प्रचलित आहेत. यासाठी ब्युटी पार्लर्समध्ये विशेष मार्गदर्शकांकडून सेवा घेता येते. त्याचप्रमाणे सौंदर्य कार्यशाळेत या विषयी विशिष्ट प्रशिक्षणही घेता येते. नखं लांब नसतील तर अँक्रॅलिक नेलकीट खरेदी करून ही समस्या सोडवता येते. विशेषत: पार्टी अथवा विशेष समारंभासाठी ही मदत योग्य ठरते. अँक्रॅलिक नखं लावून नखांचं सौंदर्य वाढवता येतं. काम झाल्यावर ही कृत्रीम नखं काढून ठेवता येतात. मात्र त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. एकदा नखं लावल्यावर दोन-तीन आठवड्यांपर्यंत हातावर राहू शकतात. नेल आर्टमध्ये वैविध्य आणण्याची गरज असते. पोलका, मोझ्ॉक, चेक्स, ग्लिटरी मून लाईटचा फील देणारी नेल आर्ट सध्या बघायला मिळते. नखांवरची कलाकुसर पेहरावाशी मिळती-जुळती असावी. नखांचा नैसर्गिक लूक टिकवायचा असल्यास मेकअपही हलका हवा. पेंट, बिड्स, कृत्रीम फुलं, वेलवेट अथवा अन्य अँक्सेसरीजद्वारा नखं सजवता येतात. यासाठी वॉटरप्रूफ साहित्य वापरणं चांगलं.