आकर्षक सजावट

decoretionनवरात्री चा सण आणि थोड्या दिवसात दिवाळी . घर छोटेशे असेल तर , या छोट्याशा जागेत सजावट करण्याची जबाबदारी गृहिणीकडे येते. अशा परिस्थितीत थोडीशी कल्पकता बाळगली तर ही सजावट अधिक आकर्षक पद्धतीने करता येते. किचनमध्ये अवास्तव भांडी किंवा वस्तू यांचा भरणा करू नये. अशी भांडी शक्यतो ओट्याच्या खाली किंवा कपाटात ठेवावीत. शक्य असल्यास भिंतीमध्ये कपाटे करून घ्यावीत. फ्रीज, मिक्सर यासारख्या वस्तू आवश्यक असल्यामुळे इतर जागा अडवणार्‍या वस्तूंची भर करू नये. हॉलमध्ये सोफाकमबेड अशा पद्धतीचा बेड असावा. बेडरूममध्ये भिंतीतील वॉर्डरोब असावेत. त्यामुळे जागा कमी लागते. डायनिंग टेबल घ्यायचे झाल्यास ते अर्धवर्तुळाकृती घ्यावे. त्यालाही जागा कमी लागते. शिवाय त्यावर एकाच वेळी चार माणसे बसू शकतात. मुलांच्या अभ्यासासाठी असलेल्या कपाटालाच एक फळी जोडलेली असावी. उपयोग झाल्यानंतर ती सरळ करून ठेवता येईल, अशी तिची रचना असावी. अशा पद्धतीने घराची अंतर्गत सजावट केल्यास छोट्या जागेतही आकर्षकता साधता येते.