आकर्षण एम्ब्रॉयडरी साड्यांचे

embroidered-sareeलग्नसराईमध्ये आपण इतरांशिवाय आकर्षक दिसावे, असे प्रत्येकीलाच वाटते. आपली साडी हटके असावी, अशी इच्छा असेल तर काही क्लृप्त्या कामी येतील. सध्या भरजरी साड्यांचा ट्रेंड कमी होत आहे. त्याऐवजी ट्रेंडी, आकर्षक आणि वेगवेगळ्या पद्धतीची एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या चलतीत आहेत. उदा. गुलाबी रंगाच्या जॉर्जेट साडीला रुंद काळी बॉर्डर लावावी. यावर क्रीम कलरच्या धाग्यांनी स्टिच एम्ब्रॉयडरीनं बनवलेलं पानाफुलांचं डिझाईन असावं. पदराला गुलाबी रंगातील चिकन एम्ब्रॉयडरी असेल तर बहार येईल. या एम्ब्रॉयडरीच्या खाली ब्लॅक एम्ब्रॉयडरीचा एक वेगळा पॅटर्न आणि त्यासोबत गोल्डन रंगाची क्रोशिया लेस असावी. अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवलेली साडी सगळ्यात उठून दिसेल यात शंका नाही. यावर मोती अथवा टिकली वर्क करता येतील. पारंपरिक साड्यांच्या भाऊगर्दीत अशा साड्या नेहमीच खुलून दिसतात. या साड्या छोट्याशा पार्टीसाठीही योग्य ठरतात.