आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरिता भारतीय संघाची निवड
|आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरिता १७ सदस्यीय भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. हरविलेला फॉर्म आणि सततच्या तिने त्रस्त असल्याने गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर राहिलेला वेगवान गोलंदाज झहीर खान याचे संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, त्याच वेळी रणजी सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केल्याने पुनरागमनाची आशा लागलेल्या सलामीचा फलंदाज गौतम गंभीरच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे.
वीरेंद्र सेहवाग आणि हरभजनसिंग ह्या अनुभवी आणि एकेकाळी संघाचे आधारस्तंभ राहिलेल्या खेळाडूंचाही ह्या दौऱ्याकरिता विचार झालेला नाही. ऑस्ट्रेलीयाविरीद्धच्या मोहालीतील एकदिवसीय सामन्यातील एकाच षटकात तब्बल तीस धावा देऊन संघाच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या इशांत शर्माला एकदिवसीय आणि कसोटी दोन्ही संघात स्थान मिळाले असून अंबाती रायडू आणि उमेश यादव यांचाही ह्या दौऱ्यासाठी संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघ पुढीलप्रमाणे,
कसोटी संघ: महेंद्रसिंह धोनी, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, रिद्धमान सहा, झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सामी, उमेश यादव, ईशांत शर्मा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, प्रज्ञान ओझा.
एकदिवसीय संघ: महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन, सुरेश रैना, युवराज सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहित शर्मा, अमीत मिश्रा.