आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ?

stack_of_books   प्रत्येक साहित्य हे कोणत्या ना कोणत्या प्रेरणेतूनच निर्माण झालेले असते. ती प्रेरणा कधी रागातून, प्रेमातून, तिरस्कारातून अथवा अहंकारातूनही मिळालेली असते. काहीचे व्यक्तीगत आयुष्य त्या आयुष्यात आलेले चांगले – वाईट अनूभवही काहींच्या साहित्याची प्रेरणा ठरत असतात. त्यामुळे ढोबळ्मानाने विचार करता एखाद्या प्रेरणेतून निर्माण झालेले साहित्य वाचकांना कोणती ना कोणती प्रेरणा देतच असतात चांगकी अथवा वाईट. त्यामुळे आजचे साहित्य ही प्रेरणादायी आहे असेच म्ह्णावे लागेल नाही का ?

एखादे प्रेमावर आधारित साहित्य वाचून प्रेमात धोका खाल्लेल्याला आत्मह्त्या करण्याची प्रेरणा मिळाली तर त्या साहित्याला प्रेरणादायी साहित्य म्ह्णता येईल का ? नाही म्ह्णता येणार. जे साहित्य मणूष्यास उच्चतम ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरीत करते अथवा समाजासाठी, देशासाठी अथवा जगासाठी काही मोठे कार्य करण्यासाठी प्रेरीत करते ते साहित्य प्रेरणादायी मानले तर आजचे साहित्य किंचितही प्रेरणादायी नाही असच म्ह्णावं लागेल. मागच्या काही दशकात एक – दोन पुस्तके सोडली तर ज्याला फार प्रेरणादायी म्ह्णावे असे पस्तक वाचनात आले नाही. ज्याला अल्प प्रमाणात प्रेरणादायी म्ह्णावे असे साहित्य निर्माण झाले ही असेल पण  त्यातून प्रेरणा घेऊन कोणी फार मोठे कार्य केल्याचे वाचनात अथवा पाहण्यात आले नाही.

आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा फक्त पैसा, धन-संपत्ती आणि सुखसाधने मिळविण्यासाठीच चाललेली आहे. या स्पर्धेतून वेळ काढून आजची पिढी स्वतःच मनोरंजन करण्याचा थोडासा प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना आवश्यक असते मनोरंजन करणारे साहित्य. आजच्या जगात प्रेरणादायी साहित्य वाचण्याची गरज पडते ती जीवनात अपयशी ठरलेल्या लोकांना . अशाही लोकांना झटपट पैसा मिळविण्याचे मार्ग सांगणारे साहित्य हे प्रेरणादायी साहित्य वाटते. सर्वाधिक लोकांचा मनोरंजनाकडे कळ लक्षात घेता आता जगभरात साहित्यनिमिर्ती ही मनोरंजनाला डोळ्यासमोर ठेऊनच होऊ लागली आहे. सध्या आपल्या देशात प्रकाशित होणारे साहित्य पाहिल्यास ते सहज लक्षात येते. खर्‍या अर्थाने प्रेरणादायी साहित्य निर्माण करणारे तुरळ्क आहेत आणि त्यांचाही असं साहित्य निर्माण केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या कंबरटा मोडलेला आहे. अगदी इंटरनेटवरही एक प्रेम कविता शेअर केल्यावर तिला हजारो लाईक मिळतात पण त्याउलट प्रेरणादायी कवितेला मोजून दहा- वीस लाईक मिळतात. आज प्रेरणादायी साहित्य वाचण्याची वाचकांचीच इच्छा नाही त्यामुळे ते निर्माण करण्याच्या भानगडीतच हल्ली कोणी पडताना दिसत नाही. पूर्वी लिहिल्या गेलेल्या प्रेरणादायी साहित्यालाच आजही बाजारात बर्‍यापैकी मागणी असल्याचे दिसते. त्यामुळे आजचे साहित्य प्रेरणादायी आहे का ? या प्रश्नाचे ठोस उत्तर आज कोणालाही देता येणार नाही.

 

One Comment

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *