आठवण

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते ,

कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यां प्रमाणे गळते ,

तर कधी फ़ुला प्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते ,

जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते….