आता ग्रामपंचायतच बनेल ‘बँक’….

imagesआता ज्या गावात बँक नाही त्या गावातील गावकऱ्यांना बँकेत खाते उघडण्यासाठी अथवा बँक संबंधित इतर कामांसाठी तालुक्याच्या गावी जाण्याची आवश्यकता नाही. कारण बँक नसलेल्या महाराष्ट्रातील अठरा हजार गावातील गरम पंचायतच आता बँक बनणार आहे. गावकरी आपल्या गावातील अडी-अडचणी सोडविण्यासोबतच ग्रामपंचायतीतून आपले आर्थिक व्यवहारही करू शकतील. गरमपंचायतीला बँकेचे स्वरूप देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असेल. ह्यासाठी राज्य शासन, बँक आणि सिटीझन सर्व्हिस सेंटर यांच्यात त्रिपक्षीय करार केला जाणार असून राज्यातील चारशे गावात प्रायोगिक तत्वावर हि योजना सुरु देखील करण्यात आली आहे.

केवळ आर्थिक व्यवहारासाठी दुसऱ्या गावात जाणाऱ्या ग्रामस्थांची ह्या योजनेमुळे चांगली सोय होणार आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे पैसे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे, पेन्शन बँक खात्यात जमा होत असतात. राज्यातील सुमारे बावीस हजारांहून अधिक गावात बँकाच नसल्याने तेथील ग्रामस्थांना बँकेसंबंधित व्यवहारांसाठी बँक असलेल्या गावात किंवा तालुक्याच्या गावी जावे लागत असे. हे बऱ्याचदा गैरसोयीचेदेखील ठरत असे. मात्र, सदर योजनेमुले अशा गावातील नागरिकांची बँक नसल्याने होणारी त्रेधातिरपीट थांबणार आहे.