आता पाणी पिण्याच्या वेळेचाही “अलार्म”…..!

index      आश्चर्य वाटलं न असे वाचून? मात्र हे खरं आहे! स्मार्टफोनच्या ह्या जमान्यात एक असे अँप तयार केल आहे टे आपल्या आवश्यक्तेनुसार आपण केव्हा आणि किती पाणी प्यावे हे तुम्हांला सांगेल. ह्या अँपचे नाव आहे ‘वॉटर युवर बॉडी’. आपली सकाळी उठण्याची वेळ आणि रात्री झोपण्याची वेळ, इतर शारीरिक माहिती जर आपण ह्या अँप मध्ये फीड केली तर हे अँप आपल्याला पाणी पिण्याचे प्रमाण आणि वेळ सुचवेल.

तुम्ही किती पाणी प्यायलात याची नोंद तुम्ही करून ठेवायची. त्यासाठी या अँपमध्ये अगदी सहज निवडता येतील असे पर्याय आहेत. लहान कप, मोठा मग, लहान बाटली, मोठी बाटली अशा स्वरूपात तुम्ही या नोंदी करू शकता. शिवाय हे अँप तुम्हाला मध्ये मध्ये अगदी इंटरेस्टिंग माहिती आणि टिप्सही देईल.
सुरु वातीला अगदी साधीशी किंवा अगदी गरज नसलेली गोष्ट जरी ही वाटत असली तरी सवय अंगवळणी पडल्यावर लक्षात येईल की, आपण किती कमी पाणी पीत होतो किंवा किती मोठय़ा गॅपनंतर पाणी पीत होतो. एक चांगली सवय लावून घेण्यासाठी हे अँप डाऊनलोड करायला हरकत नाही.
अँण्ड्राईड मार्केट म्हणजेच गुगल प्ले स्टोअरमध्ये हे अँप फ्री डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.

2 Comments

Leave a Reply to Baburao Bangar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *