आमचं कोंकण

कोकण

कधी कधी अस वाटत कि सर्व काही सोडून दूर कुठेतरी निवांत ठिकाणी जाऊन बसावं जिथ कुणीच आपल्याला DISTURB करणार नसावं.स्वच्छंदी मनाने निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घ्यावा.

कलरव करणारे पक्षी,अंगाला झोंबणारा गारवा,खळखळ वाहणारे ओढ्याचे पाणी,सूर्याचा येणारा मंद प्रकाश……किती सुखकर कल्पना आहे हि,

आजच्या या धकाधकीच्या आधुनिक जगात,माणूस इतका व्यस्त झाला आहे,इतका कंटाळलेला आहे कि त्याला आता हवी आहे,शांतता,हवा आहे एकांत.जगण्यासाठीच्या जीवघेण्या संघार्षातुनी एक तास तरी हवी आहे मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी.

प्रत्येकच विशेषकरून निसर्ग प्रेमींच स्वप्न असत कि दूर नभाच्या पल्याड निर्जन एकांत स्थळी,स्वताच एक टुमदार घर असाव,त्या घराला आधार देणार प्रेमाच छप्पर असाव जिथं कुठलीच वर्दळ नसावी,कसलीच कटकट नसावी फक्त न फक्त शांतता मिळावी एवढाच अट्टाहास असतो.

त्यासाठी कोंकण शिवाय दुसरा पर्याय तरी कुठला असू शकतो,मस्त पैकी निसर्ग,टुमदार घर असलेली खेडी,लाल माती,आंबे,फणस,काजू,मासे.खारट समुद्र कितीतरी मनाला सुखावणारे प्रसंग अनुभवण्यासाठी कोंकण हा उत्तम पर्याय आहे.

मग वाट कसली बघता…….कधी येणार आमच्या कोकणात

10 Comments