आमच कोंकण

kok2

यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाऱ्याची पातळी ४३ डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचली आणि घामाच्या धारांनी अवघी महाराष्ट नगरी  न्हाऊन निघाली. साधं घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही कुणाचं मन धजावत नाहीये; इतका सगळ्यांनी उन्हाचा धसका घेतलाय! पण म्हणून काय. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं नाही? छे! मुळीच नाही. अहो, ‘येवा, कोकण आपलाच आसा’ म्हणत ‘सिंधुरत्न’ अर्थात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सर्वाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे, डॉल्फिनचे दर्शन, स्नॉर्केलिंग, विविध वॉटर स्पोर्टस् तुम्हाला आलेला थकवा नक्कीच पळवून लावतील. मग, घालवायची ना यंदाची ‘सुट्टी पाण्यात?’

लोककला, साहित्य यांचा स्वतंत्र वारस असलेल्या कोकणाला विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांना लाभलेला समुद्रकिनारा, हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाडय़ा, जलदुर्ग, समुद्रतीरावरील देवालये पाहताना मन भारवून जाते. समुद्रसफरीत होणाऱ्या डॉल्फिन-दर्शनामुळे हा आनंद द्विगुणित होतो. शिवाय इथल्या खास मालवणी जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते, ती वेगळीच! उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली असताना येथील पर्यटन स्थळे आपल्याला माहीत झाल्यास कोकण पर्यटनाचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल.
सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत. तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड व वेंगुर्ला हापूस आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
 विजयदुर्ग हे येथील प्रसिद्ध बंदर आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला किल्ला मराठी आरमाराचे केंद्रस्थान म्हणून ओळखला जातो. ८०० वर्षांपूर्वी राजा भोज याने हा किल्ला उभारला. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. सुमारे सतरा एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. इथे वीस बुरुज, देवतांची मंदिरे, तोफगोळे पाहायला मिळतात. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा किल्ला इतिहासप्रेमींना साद घालतो. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळताना मन प्रफुल्लित होते. समुद्रातील तटावरून डॉल्फिन-दर्शन घेता येते. बाजूलाच सुंदर विजयदुर्ग बीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरळे येथून विजयदुर्गला जाणारा ५२ कि. मी.चा मार्ग आहे. वाटेत वाघोटन, पडेल ही गावं लागतात. विजयदुर्ग देवगडवरून २७ कि. मी. अंतरावर आहे.
ह्यांसारखे अनेक मनाला तृप्त करणारे स्पोट आपण बघू शकतो आणि,उन्हाळ्याची सुट्टी मजेत घालवु शकतो त्यासाठी कोंकण ची सफर तुम्हाला करावी लागेल