आयुर्वेदक गूळ
|गूळ हा चवीला गोड असल्यामुळे तो सर्वांनाच खायला आवडतो व प्रत्येकाच्याच घरात असतो. याचे फायदे व तोटे खूप कमी लोकांना माहीत असतात.
१.गूळ हा उष्ण असतो. त्यामुळे गर्भवती स्त्रीने तो खाण्याचे टाळावे.
२.विज्ञानानुसार गोड खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्तसंचार वाढतो. ऊर्जा मिळते. यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी गूळ खावा. तसेच गोड खाल्ल्याने तुमचे मन शांत राहते व शांत मनाने काम केल्यास यश निश्चितच मिळते.
३.अतिप्रमाणात गूळ खाणे चांगले नाही त्यामुळे मधुमेह होण्याची दाट शक्यता असते.
४.गुळाला आयुर्वेदातही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यानुसार सर्दी, कफ यासारख्या आजारांवर गूळ फायदेशीर असतो.
५.गूळ हा उष्ण असतो, म्हणूनच हिवाळय़ात तीळगुळाचे लाडू खाणे शरीरासाठी लाभकारी ठरते.
अशा प्रकारे वेगवेगळय़ा कारणांसाठी याचा उपयोग केला जातो.