आयुर्वेदिक वेलदोडे

Cardamom podsवेलदोडे आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. वेलदोडेला वेलची किवा इलायची असेही म्हणतात. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायची हा प्रकार वापरला जातो. वेलदोड्याचे औषधी उपयोग पुढील प्रमाणे .

१. इलायचीच्या सेवनाने पोटातील गॅस, सूज, हृदयातील जळजळ कमी होते.

२.पचनशक्ती वाढते. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर दोन-तीन  इलायची व आल्याचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धणे पावडर एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण गरम पाण्यातून घेतल्यास अपचनाची समस्या दूर होते.

३. इलायचीमध्ये अँण्टिबॅक्टेरियल गुण असतात. त्यामुळे  इलायची खाल्ल्याने तोंडातील दुर्गंधी दूर होते.

४.नियमित इलायचीचे सेवन केल्यास अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी निगडित आजार दूर होतात.

५. इलायचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलेसिस प्रक्रियेला लाभ होतो. त्यामुळे हृदयाचे ठोके किंवा गती नियमित ठेवण्यासाठी मदत मिळते.

६.एक ग्लास दुधामध्ये एक-दोन चिमूट  इलायची पावडर आणि हळद टाका. चवीनुसार साखर टाकू शकता. अँनिमियाची लक्षणं आणि कमजोरीपासून दूर राहण्यासाठी दररोज रात्री हे दूध प्यावे.वेलची सुगंधी असून गोड पदार्थांची लज्जत वाढवायची असेल तर ती उपयोगात आणली जाते.