आरोग्य केसांचे

hair 1केसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात. दुभंगलेल्या केसांची वाढही खुंटते. असे केस निस्तेज दिसतात. केवळ केसांचं बाह्यसौंदर्यच बिघडतं असं नाही तर शुष्कतेमुळे मुळापासून केस खराब होतात. सध्या केस कलर करण्याचं प्रमाण वाढलं आहे. वेगवेगळे डायही वापरले जातात. वारंवार पर्म केल्यास, हेअर स्प्रे वापरल्यास, बॅक कोम्बिंगची सवय असल्यास, रोज हेअर ड्रायरचा वापर होत असल्यास अथवा तीव्र उन्हात फिरण्याचं प्रमाण जास्त असल्यास केस शुष्क होतात. हा त्रास असेल तर सर्वप्रथम या सवयी कमी करायला हव्यात. केसांची योग्य त्या पद्धतीने स्वच्छता राखायला हवी. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारातून ए, बी आणि डी जीवनसत्त्व तसेच कॅल्शियमचा योग्य पुरवठा व्हायला हवा. भरपूर पाणी पिणं हाही केसांचं आरोग्य उत्तम राखण्याचा उपाय आहे. बाहेर पडताना केस स्कार्फने झाकावेत. हलका व्यायाम आणि मोकळ्या वातावरणातील चालणं हे केसांसाठी उपकारक ठरू शकतं. काही औषधोपचारही उपयुक्त ठरतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *