आला उन्हाळा तब्बेत सांभाळा ..!
|यंदा गारपीट मुळे प्रलंबित असलेला उन्हाळा अखेर जाणवायला लागला आहे.
हळू हळू उन्हाची तीव्रता भासू लागली आहे.त्यामुळे वाडत्या उन्हाच्या तापापासून बचाव करण्यासाठी बाजारात विविध शीतपेयांची आवक वाडली आहे,पण जरा सांभाळून……… ?ऊन जसजसं वाढतय तसतश्या आरोग्याच्या समस्या देखील वाढल्या आहेत.उष्माघात,पोटाचे विकार,अजीर्णता,चक्कर येणे,उलट्या,जुलाब ह्यांसारखे विकार उन्हाळ्यात प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्य देखील सांभाळायला हवं,त्यासाठी उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करायला हवा,भर उन्हात फिरणं वर्ज्य करावं ज्यामुळे उष्माघात उद्भवणार नाही.हवं तर आपली कामे सकाळीच उरकून घ्यावीत.उष्णता वाढली म्हणजे थंड पेयांचा अतिरेक वाढतो,तो सहसा टाळावा किव्हा प्रमाणात असावा,फळे ड्रायफ्रुट ह्यांचा आहारात समावेश असायला हवा. घरातून उन्हात बाहेर पडतांना डोक्यावर सुती रुमाल,कॅप किव्हा छत्रीचा वापर हा उन्हापासून बचावाचा उत्तम पर्याय,उन्हाळ्यात आपण थंड पाण्याच सेवन अधिक करतो तेही जरा प्रमाणात असायला हवं. मुळात आहारामध्ये सुद्धा बदल व्हायला हवा,जास्तीत जास्त पालेभाज्यांच सेवन आरोग्यासाठी उत्तम पर्याय आहे.लग्न सराई आणी आग ओकणारा सूर्य ,दोघांपासून सुटका नाही,म्हणुन खबरदारी हा त्या मागचा महत्वाचा दुवा होऊ शकतो त्यामुळे सांभाळून…… !