आलूचाट

साहित्य :-aloo chat

१)      दोन उकडलेले बटाटे

२)     एक कांदा बारीक चिरून

३)     थोडं काळ मीठ (पाव चमचा)

४)     पाव चमचा साधं मीठ

५)    थोडी चिरून कोथिंबीर

कृती :-

१)      बटाट्याचे सोलून लांब लांब तुकडे करून प्लेटमध्ये मांडावेत .  त्यावर कांदा घालावा . 

२)     त्याच्यावर चाट चटणी घालावी (तीन-चार चमचे) , मग दोन्ही प्रकारचं मीठ भुरभुरावं , वरून कोथिंबीर घालावी . 

३)     याच पद्धतीनं पिकलेल्या केळ्याचा बनाना चाट करता येतो .  फ्रुट चाटसाठी अननसाचे तुकडे , सफरचंद , केळी , पेरू यासारखी आंबटगोड फळं घ्यावीत .