आलू पोस्तो (बंगाली)
|१) अर्धा किलो बटाटे
२) पाऊण वाटी खसखस
३) मोहरी पूड दोन चमचे
४) हिरव्या मिरच्या दोन-तीन
५) जिरेपूड दोन चमचे , तेल
६) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) खसखस कडकडीत पाण्यात भिजवावी . (दुप्पट पाणी घ्यावं .) बटाट्याची सालं काढून तुकडे करून पाण्यात ठेवावे .
२) खसखस अर्धा तास भिजल्यावर हिरव्या मिरचीबरोबर बारीक वाटून घ्यावी .
३) कढाईत तेल गरम करून त्यात जिरेपूड टाकावी . बटाट्याचे तुकडे टाकून तीन-चार मिनिटं शिजवावे .
४) वाटलेल्या खसखशीत थोडं पाणी घालून मोहरी पूड घालावी व परत वाटून घ्यावी .
५) हे मिश्रण बटाट्यावर ओतावं . नीट हलवून चवीनुसार मीठ घालावं .
६) बटाटे शिजले की मोहरीचा दर्प येतो . (ग्रेव्ही घट्टच असली पाहिजे . आलू-पोस्तो ही भाजी पुरी किंवा पराठ्यांबरोबर खातात . तिचा रंग पांढरा किंवा क्रीमीच असतो . )