आळशी लोकांबरोबर काम करताना

sleeping_officeआळशी लोकांबरोबर काम करताना खूप त्रास होतो , त्याचाच एक भाग म्हणून आज हा लेख प्रकाशित करीत आहोत .
दैनंदिन जीवनात ऑफिस मध्ये काम करताना अश्या व्यक्ती आपल्या आयुष्यात हमखास येतात . ज्या अकारण आपल्याला मानसिक त्रास देऊन जातात
अश्या वेळी कश्या पद्धतीने वागावे .

  • त्या कर्मचार्‍यावर सतत रागवणे चुकीचे ठरते. त्याऐवजी जीवलग मित्राप्रमाणे त्यांच्याशी बोलण्याचा प्रय▪करावा.
  • दोघांचेही लक्ष्य एकच असल्याचे आणि त्या दृष्टीने तुम्ही त्याच्याविषयी चिंतेत असल्याचे समजावून सांगावे.
  • आळशी सहकार्‍याकडून कंपनीच्या कोणत्या अपेक्षा आहेत आणि तो प्रत्यक्षात काय करत आहे हे त्याला समजावून सांगावे.
  • कंपनीच्या अपेक्षा आणि तो प्रत्यक्ष करत असलेले काम यातील फरक समजावून सांगावा. त्याच बरोबर या परिस्थितीकडे तो काही वेगळ्या दृष्टीने पाहत आहे का हेही जाणून घ्यावे.

गुणवत्ता आणि उत्पादकता वाढवण्याबाबत आग्रही असणारे कर्मचारी अशा सहकार्‍यांबाबत काही कृती करण्यासाठी आग्रही असतात. परंतु अशी प्रकरणे शांततेने आणि संयमाने हाताळायला हवीत. कार्यालयात तणाव निर्माण होणार नाही तसेच कर्मचार्‍यांचा आत्मविश्‍वास कमी होणार नाही हे पाहायला हवे. किंबहुना, तो वाढेल याकडे लक्ष देणेही तितकेच महत्त्वाचे ठरते. सहकारी कर्मचार्‍यांमधील आळशीपणा किंवा कामचुकारपणा सहन होत नसेल आणि त्याबद्दल समजावून देऊनही त्या कर्मचार्‍यांमध्ये सुधारणा होत नसेल तर दुर्लक्ष करणे योग्य ठरते. वाद घालून अथवा मन:स्ताप करून घेऊन हा प्रश्न सुटणार नाही.