आवाज बिघडलाय…?

Quinsy. The boy keeps for a sick throatआवाज बिघडलाय…? स्वरयंत्रात काही बिघाड झाल्यास आवाजासंबंधी तक्रार संभवते. आवाज फाटणे, आवाज बसणे, बोलताना घशात वेदना जाणवणे आदी त्रास होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बरेचदा घशाच्या दुखण्याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही. पण अनेक कारणांमुळे घसा दुखू शकतो. स्वरयंत्राला सूज, स्वरयंत्रात गाठ अथवा घशाचा कर्करोग, व्होकल पॉलिकची समस्या, स्वरयंत्रातील लकवा अथवा कमजोरी, अंतस्त्रावी रक्तवाहिन्यांमधील दोष, स्वरयंत्रातील बदल आदी अनेक कारणांमुळे हा त्रास संभवतो. यासाठी औषधं अथवा शस्त्रक्रियांद्वारे उपचार होतात. मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं होणार्‍या माइक्रोलॅरिजन्जयल सर्जरीमध्ये चीर घेतल्याविना स्वरयंत्रातील दोष दूर होतात. यामध्ये शस्त्रक्रियेनंतर पहिल्या आठवड्यातच आवाज ठीक होतो. थायरोप्लास्टीमध्ये गळ्याच्या अंतर्गत भागात चीर घेऊन स्वरयंत्राचा आकार आणि कार्यातील दोष दूर केले जातात.