आशयलेखन – एक सुवर्ण संधी
|सध्या आपल्या शहरात मोठमोठय़ा कंपन्या, संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करावी लागते. या जाहिरातीसाठी यांना चांगल्या आशयलेखकांची गरज भासते. एखाद्या गाडीची जाहिरात जर तुम्ही पहाल तर त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला आकर्षित करण्यासाठी जे वाक्य वापरले जाते. उदा. (उगाचंच नाही, जगातले १३ लाख लोकही गाडी वापरताहेत) किंवा मॉऊंटन ड्यूची जाहिरातीमध्ये वापरले जाणारे वाक्य ‘डर के आगे जीत है’ या लेखनाला आजच्या जगात खूप महत्त्व आहे.यासाठी तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून या क्षेत्रात करियर करू शकता.
*या क्षेत्रासाठी १२ किंवा १५ वीपर्यंत शिक्षण खूप आहे.
*या क्षेत्रासाठी डिग्री असणे गरजेचे नाही. पण ज्यांच्याकडे र्जनालिझमची डिग्री आहे असे विद्यार्थी या क्षेत्राकडे करियरच्या दृष्टीने बघू शकतात.
*या क्षेत्रातील करियर करण्यासाठी इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ किंवा अजून कोणत्याही भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते.तुम्हाला जितक्या जास्त भाषा येतात तितके हे क्षेत्र तुम्हाला लाभदायी ठरेल.
*या क्षेत्रासाठी लोकांशी बोलण्याची आवड असावी. बोलका स्वभाव, वेळी-अवेळी काम करण्याची मानसिकता, जनसंपर्क अशा गोष्टी अंगी असणे आवश्यक आहे.
*आशयलेखनाला एखाद्या मासिक किंवा संस्थामध्ये १0 ते १२ हजार रुपये मिळतात. ५-६ वर्षांचा दीर्घ व्यावसायिक अनुभवानंतर स्वतंत्रपणे व्यवसाय केल्यास ४0 ते ५0 हजारांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.
याचे लेखन वेगवेगळय़ा क्षेत्रासाठी करू शकता. उदा. एखाद्या विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. तो हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा, फार्मास्युटिकल कंपन्या आदींसाठी तो आशयलेखन करू शकतो. बी. कॉम म्हणजे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्याकडे डिग्री असल्यास तो बँकिंग, म्युच्युअल फंड, कंपन्या, शेअर मार्केट, शेअर बाजार, बँकेचे वार्षिक अहवाल आदींसाठी आशयलेखन करू शकतो. कला क्षेत्रातील विद्यार्थी सामाजिक संस्था, क्रीडा, आर्थिक आदी विविध क्षेत्रांतील लोकांसाठी आशयलेखन करू शकतो. आपणास जे सुचेल ते लिहीत राहा म्हणजे नेहमीच्या सरावातून अजून काही वेगळे मिळत राहते.
> आशयलेखनासाठी नोकरी कुठे शोधावी.
१.मार्केटिंग साहित्य म्हणजे एका विशिष्ट उत्पादनांबाबत आकर्षक माहिती चित्तवेधक पद्धतीने देता आली पाहिजे.
२.तांत्रिक क्षेत्रात वेबसाईट, स्वास्थ्य आदी विविध विभागांसाठी आशयलेखन करू शकता. या क्षेत्रासाठी तुम्हाला जास्तीत जास्त वाचन करणे आवश्यक असते. कारण तुम्ही तुमच्या अनुभवाने, कल्पनाशक्तीनेच लिहू शकता. यासाठी तुम्हाला वयाची अट नसते. या क्षेत्रासाठी भरपूर प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.