आहारात असू द्या वांगं

Purple Eggplantवांग्याची रुचकर आणि मसालेदार भाजी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. भाजीव्यतिरिक्त अन्य पाककृतींमध्येही वांग्याचा वापर होतो. वांग्यामध्ये बरीच औषधी तत्त्व असतात. वांग्यात एंटीऑक्साडेंट्सची पर्याप्त मात्रा असते. यातील क्लोरोजिनिक अँसिडमुळे रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. वांग्यामुळे जंतुसंसर्गाचा धोकाही कमी होतो. यामधील लोहामुळे शरीरास मजबुती मिळते. नियमितपणे वांग्याचं सेवन केल्यास शरीरातील वाईट कोलोस्ट्रॉलचा स्तर कमी होतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. वांग्यामधील फाईटोन्यूट्रियेंट नामक तत्त्व मस्तिष्कातील कोशिकांना क्षतिग्रस्त होण्यापासून सुरक्षित ठेवतात. वांग्याच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदू कार्यक्षम होतो. वांग्यामध्ये सी जीवनसत्त्वाची त्याचप्रमाणे निकोटिनची पर्याप्त मात्रा असते. त्यामुळे सिगारेटचे व्यसन सुटण्यासाठी वांग्याची मदत होते.