आ गये अच्छे दिन ?

namo

अच्छे दिन आने वाले हे…….,अस म्हणता म्हणता,तोंडाच पाणी कधी पळून गेलं हे कळलचं नाही.

सत्ता पालट झाल्यावर,पुन्हा या देशात सोन्याचे दिवस येतील ,हा सर्व सामान्य जनतेने टाकलेला विश्वास फोल ठरला.

भ्रष्टाचार,महागाई,दहशतवाद,ह्यांसारख्या समस्यांनी पिचलेल्या भारतीयांना आता नवा बदल हवा होता.सरकारची नामुष्की आणि पंतप्रधान ह्यांच्या थंड कारवाईने जनता त्रासली होती,त्यामुळे जनतेला आणि सर्वसामान्यांना बदल हवा होता,देशाच्या उन्नतीसाठी नवा पर्याय हवा होता.

म्हणून युती सरकारला भरघोस मताधिक्क्याने सत्ता हाती दिली,मात्र जनतेच्या ह्या अपेक्षा खोट्या ठरल्या अस काही अंशी वाटत आहे,आणि त्याच कारण म्हणजे मोदी  सरकारच्या एक महिन्याच्या कालावधीतच वाढलेली महागाई,मग ती रेल्वे दर वाढ असो,पेट्रोल दर वाढ असो,वा  आत्ता झालेली सिलेंडरच्या किंमतीत झालेली वाढ असो,हे सर्व चित्र बघून असच वाटत आहे कि,अच्छे दिन अने वाले थे ?वो कहा हे?

कॉंग्रेस सत्तेवर असतांना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणार युती सरकार आता मात्र वाढलेल्या महागाई देशाची अर्थ व्यवस्था मजबूत करण्यासाठी केली गेली आहे असा कांगावा करतांना दिसत आहे.

मात्र ह्या सर्व गोष्टींशी सामान्य जनतेला काय करायचं आहे?त्यांनी तुम्हाला निवडून दिल..!

आता तुम्ही याच्यातून मार्ग काढावा,मात्र जनतेच्या खिशाला फाडून नव्हे……

 

 

One Comment