इंटरनेटच्या दरांत २५% वाढ

     internertआज विद्यार्थ्यांपासून उद्योगपतींपर्यंत प्रत्येकजण नेहमी ऑनलाईन राहण्याच्या प्रयत्नात असतो. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून अगदी जेवण्यापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ‘शेयर’ करण्याच्या अनेकांचा प्रयत्न असतो. त्याकरीता अत्याधुनिक स्मार्टफोन आणि त्यावर इंटरनेट कनेक्शन आलेच! मात्र आता ही इंटरनेट सुविधा चांगलीच महागणार आहे. २जी नेटवर्क वर एक जीबी डेटा डाऊनलोड करण्यासाठी तब्बल २५%अतिरिक्त पैसे मोजावे लागतील! साहजिकच मर्यादित ‘पॉकेट-मनी’वर मोबाईल रिचार्ज करणाऱ्या तरुणाईसमोरील अडचणी अधिकच वाढणार आहेत.

     पूर्वी लोक फक्त संपर्कात राहण्याचे साधन म्हणून मोबाइल वापरायचे. आज मात्र मोबाइल स्टेटस सिम्बॉल बनला आहे. प्रत्येकाला मोबाइल हवाच आणि त्यातही स्मार्टफोनची क्रेझ काही औरच! त्याबरोबर इंटरनेट कनेक्शन आलेच! जनतेची हीच आवड ‘कॅश’ करण्याचा उद्देश ठेऊन आयडिया, एयरटेल आणि वोडाफोन ह्या कंपन्यांनी इंटरनेट सुविधेचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.