इंटरनेट, फेसबुकवरील साहित्य स्वरूप व अपेक्षा

imagesभारतात इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुकचा प्रसार फारच झपाट्याने झाला आहे. पूर्वी लोकांना काही मोजक्या मुद्द्यांवर जोडून ठेवण्याचे माध्यम म्ह्णून फेसबुकचा वापर केला जात होता. त्यानंतरच्या काळात तरूण वर्गापुरता मर्यादित असलेला फेसबुक आज सर्व वयोगटातील, सर्व वर्गातील, सर्व जाती- धर्मातील आणि सर्व स्थरातील लोकांना व्यक्त होण्याच माध्यम म्ह्णून पुढे येत आहे. आज आपल्या देशात फेसबुकला आपल्या देशातील प्रसारमाध्यमां इतकेच महत्व प्राप्त झालेले आहे. म्ह्णूनच तर येऊ घातलेल्या निवडणूका लक्षात घेता विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी फेसबुकचा मतदारांपर्यत पोहचण्यासाठी माध्यम म्ह्णून वापर करायला सुरूवातही केली आहे. फक्त मरठी साहित्याच्या दृष्टीने फेसबुकडे पाहिले असता असे लक्षात येते की पूवी फेसबुकवर व्यक्त होण्यासाठी मराठी साहित्यिक इंग्रजीचा वापर करायचे, नंतर ते मराठी इंग्रजीतून लिहू लागले आणि आता मराठी साहित्यिक पूर्णपणे मराठीतून व्यक्त होण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सुरूवातीला फेसबुकवर मराठी साहित्य म्ह्णून मराठी कविता आणि विनोद मोठ्या प्रमाणात वाचायला मिळायचे. पण आज सर्वच प्रकारातील मराठी साहित्य फेसबुकवर अगदी मोफत वाचायला मिळ्ते ज्यात कविता, विनोद, कथा, लेख, कादंबरी, जवळ-पास सर्व विषयांना वाहिलेली ई-बुक स्वरूपातील पुस्तके काही नव्याने सुरू झालेली साप्ताहिके आणि मासिके यांचा त्यात समावेश होतो.

कधी –कधी फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य नक्की कोणाच्या मालकीच आहे या बाबत बर्‍याचदा संभ्रम निर्माण होतो कारण काही लोक इतरांच्या साहित्याखाली लिह्लेली त्या साहित्यीकांची नावे खोडून साहित्य ‘शेअर’ करतात. हे खरं म्ह्णजे थांबायला हवं. बर्‍याचदा आपल्याच कविता आपल्याच इतर कोणाच्या तरी नावाने वाचायला मिळतात तेंव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो खास करून प्रेम कविता. त्यामुळे बर्‍याचदा नामवंत कवी आपल्या नव्याने लिहलेल्या कविता फेसबुकवर प्रकाशित करीत नाहीत. हा ! पण हे खर आहे की नवोदित लेखक आणि कवी यांच्यासाठी फेसबुक हे एक अमर्याद व्यासपीठ आहे. फेसबुक मूळे आज मराठी साहित्य क्षेत्राला अनेक नवोदित कवी आणि लेखकही लाभत आहेत्‍. मराठी साहित्याच्या दृष्टीने हे हिताचेच म्ह्णावे लागेल. फेसबुकवर उपलब्ध असणारे साहित्य उत्तम असले तरी त्याला फेसबुकच्या मर्यादांचा सामना करावा लागतोच त्यामुळे फेसबुकवर उपलब्ध असणारे उत्तम साहित्य इतर माध्यमातूनही लोकांपर्यत पोहचायला हवे तसे ते पोहचताना दिसत नाही. ते साहित्य ही आपल्या पर्यत पोहचाव अशी अपेक्षा सर्वसामान्य वाचकांची असणारच. फेसबुक आता पूर्वीसारखे फक्त गपा-टप्पांचे माध्यम उललेले नसून त्याला एका मंचाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे आता फेसबुकवर सुरू असलेले रेणुका आर्ट खुले ई साहित्य संमेलन आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मराठी साहित्य क्षेत्रात असणारे फेसबुकचे महत्व अधोरेखीतच करीत आहे…

4 Comments