ई-लर्निंग
|आताची जनरेशन टेक्नोलोजीच्या बाबतीत एवढी पुढे गेली आहे की, कोणत्याही प्रकारचे जास्त कष्ट न करता आपले काम कसे पार पडेल? यासाठी त्यांचे प्रय▪चालू असतात जसे की, कॉलेजमध्ये दिले जाणारे अभ्यास अथवा प्रोजेक्ट्स, असायमेंटस इत्यादी डेटा पुस्तक अथवा नोटसमधून करण्यापेक्षा ऊकफएउळ इंटरनेटच्या आहारी जाताना दिसतात, त्याचप्रमाणे आता शाळेतील विद्यार्थ्यांसाठीदेखील त्यांचा अभ्यास त्यांना सोपा वाटण्यासाठी या नव्या टेक्नोलॉजीचा वापर करताना दिसतात आणि ते म्हणजे ई-लर्निंग.
ई-लर्निंग काही जास्त न बोलता तीच गोष्ट विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर केव्हा मोठय़ा पडद्यावर दाखवले जाते. त्याच्या मागचे कारण असे आहेत की, सर्वच विद्यार्थ्यांना फळ्यावर शिकवून समजत नाही, पण आताचे विद्यार्थी जर त्यांना काही त्यांच्या मनाप्रमाणे दाखवले आणि केले तर ते त्यांना लगेच समजते. मग ई-लर्निंग इयत्ता ५ ते १0 पर्यंत असलेल्या सर्व विषयांवर अवलंबून असलेले अशा काही सीडीज बनवते जे पाहून विद्यार्थ्यांना त्यावर शिकायला पण मजा येते आणि त्यांच्या ती शिकवलेली गोष्ट पण लगेच लक्षात राहते, म्हणून आताच्या काळात जास्तीत जास्त शाळा ई-लर्निंगचा वापर करून सर्व विद्याध्र्यांना शिकवतात. ई-लर्निंगच्या सीडीज तुम्ही तुमच्या घरात आणून पण मुलांना दाखवून यातून त्यांच्या विषयाचे त्यांना पुरेपूर ज्ञान सहज सोप्या पद्धतीने देऊ शकता आणि या सीडीज् सुंदरम आणि नवनीत या दोन कंपनीमध्ये सर्वत्र बाजारात उपलब्ध आहेत, तसेच या सीडीज् इंग्रजी व मराठी माध्यमांमध्ये मिळतील. आताच्या तरुणाईला टेक्नोलोजीचा जास्तीत जास्त वापर करण्याची सवय असल्यामुळे आणि जास्त तर शाळेतील विद्यार्थी टीव्ही आणि कॉम्प्युटरच्या आहारी गेल्यामुळे त्यांना त्याचाच आवडी निवडीप्रमाणे या ई-लर्निंंगच्या सीडीज बनवण्यात आल्या आहेत. जे त्यांच्या अभ्यासाला कठीण न समजून ई-लर्निंगने खूप चांगला आणि मन लावून अभ्यास करताना दिसतात.