उकड हंडी

batata wangi

साहित्य :-

१)      बटाटे , वांगी

२)     सुरण , रताळ

३)     गाजर , फ्लॉवर

४)     नवलकोल , मटाराचे दाणे

५)    गवारीच्या शेंगा , पडवळ

६)      तांबडा भोपळा

७)    भोपळी मिरच्या आणि कांदे

८)     थोडी कोथिंबीर .

भाज्यांचं प्रमाण आवडीनुसार घ्यावं .  सर्व मिळून अंदाजे दोन किलो भाज्या असाव्यात .

मसाला :-

१)      तिखट अर्धी वाटी

२)     काळा मसाला अर्धी वाटी

३)     मीठ एक टेबलस्पून

४)     मोठया लिंबाएवढा गुळ

५)    अर्ध्या नारळाचं खोबरं

६)      हळद आणि दीड वाटी तेल .

कृती :-

१)      बटाटे , सुरण , नवलकोल आणि तांबडा भोपळा याच्या मोठया चौकोनी फोडी कराव्यात आणि गाजरं , वांगी , रताळी यांचे गोल जाड काप करावेत .

२)     पडवळाचे जरा मोठे लांब गोल काप करावेत .  गवारीच्या शेंगा निवडून सबंधच ठेवाव्यात .

३)     फ्लॉवरचे मोठे तुरे काढावेत .  कांद्याची सालं काढून भरण्यासाठी चिरा द्याव्या .

४)     कोथिंबीर बारीक चिरावी .  सर्व मसाला एकत्र करून कालवावा .  कांद्यात आणि पडवळात भरावा . 

५)    सगळ्या भाज्या आणि उरलेला मसाला एकत्र करावा .  त्यावर कच्चं तेल घालून कालवावं . 

६)      नंतर सर्व भाज्या जाड बुडाच्या पातेल्यात घालाव्यात .  मंदाग्निवर ठेवाव्यात .

७)    मधून मधून पातेलं कपड्यानं धरून अवसडाव्यात .  भाजी शिजल्यावर उतरवावी .

८)     पूर्वी ही उकडहंडी मातीच्या मडक्यात करत असत .