उत्तम मेकअपसाठी

simple makeupधार्मिक समारंभ वा लग्नसराईच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. साहजिक या ना त्या निमित्ताने सतत समारंभांना उपस्थित राहावे लागते. या समारंभामध्ये आकर्षक पेहरावाबरोबरच उत्तम मेकअप असल्यास व्यक्तिमत्त्वात उठाव येतो. यासाठी काही टिप्स कामी येतील. समारंभात छाप पाडायची असेल, तर रेड लिपस्टिकला पर्याय नाही. ग्लॅमरस लूक मिळवण्याचा हा एक सोपा पर्याय आहे. मात्र हा उपाय अवलंबताना त्वचेचा वर्ण आणि टोन लक्षात घ्यायला हवा. डोळ्यांचा मेकअप करताना लिक्विड लायनर हा पर्याय योग्य ठरतो. पेन्सिल किंवा जेलबेस्ड आयलायनरपेक्षा लिक्विड आयलायनरने डोळ्यांचे सौंदर्य वृद्धिंगत होते. मात्र हे लायनर वापरताना पसरणार नाही याची काळजी घ्यायला हवी. स्पार्कल वापरणे हाही उत्तम पर्याय आहे. आयश्ॉडो किंवा आयलायनरमध्ये स्पार्कल वापरून चांगला परिणाम साधता येतो. ग्लिटर बेस्ड आयलायनरमुळे डोळे अधिक उठावदार दिसतात. स्मोकी आयमेकअप या दिवसात विशेष खुलतो. स्मोकी आयमेकअपचे अनेक पर्याय आहेत. ब्लॅक किंवा चॉरकोल शेड्स वापरून हा परिणाम साधता येतो. ब्राऊनमधल्या विविध शेड्समुळेही स्मोकी आयमेकअप मिळतो. यामध्ये थोडी पर्पल शेड मिसळल्यास डोळे लक्षवेधी ठरतात.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *