उपमा
|
साहित्य :-
१) दोन वाटया जाड किंवा बारीक रवा
२) फोडणीचं साहित्य (दोन चमचे तेल , मोहरी-हिंग-हळद पाव चमचा)
३) हंगामानुसार मिळणाऱ्या फळभाज्या (एक ढोबळी मिरची , एक कांदा , एक मध्यम बटाटा , अर्धी वाटी फ्लॉवर , दोन मध्यम टोमाटो)
४) मसालेभाताचा मसाला किंवा घरी करतो टो कच्चा गरम मसाला
५) चिंचगुळाचा कोळ पाव वाटी
६) तिखट आवडीप्रमाणे
७) चार वाटया पाणी
८) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) एका मोठया कढाईत फोडणी करून घ्यावी . त्यात वरील सर्व भाज्या मध्यम आकाराच्या फोडी करून घालाव्या . शिजत ठेवाव्या .
२) दरम्यान रवा वेगळा भाजून घ्यावा . मायक्रोवेव्हमध्ये आधी दोन मिनिटं भाजून घ्यावा नंतर हलवून परत दोन मिनिटं भाजावा .
३) कढाईत भाजल्यास थोडयाशा तेलावर वेगळा भाजून घ्यावा . आता मघाशी फोडणीस टाकलेल्या भाज्या शिजल्या असतील , त्यात हा भाजलेला रवा टाकावा .
४) एका भांडयात चार वाटया गरम पाणी घेऊन त्यात मीठ , चिंचगुळाचा कोळ , दोन चमचे गरम मसाला घालावा .
५) हे पाणी रव्यात घालून व्यवस्थित हलवून घ्यावं . झाकण ठेवून चांगली वाफ येऊ दयावी .
६) वरून ओलं खोबरं , कोथिंबीर पेरावी . मीठ , चीनगुळाचा कोळ , मसाला पाण्यात घातल्यानं ते रव्यात नीट मिसळत .