उपयुक्त टीप्स

helpful tips१.साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो.

२.पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो.

३.गरम तव्यावर थालिपीठ थापता येत नाही. म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिकवर थापून मग थालिपीठ तव्यावर टाकावे.

४.सुगंध यावा यासाठी दही विरजताना त्यात कडीपत्त्याची दोन तीन पाने टाकावीत.

५.बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी. ही खीर चवीला छान लागते.

६.कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी. पीठ लवकर चाळले जाते.