उपासाचे बटाटेवडे
|साहित्य :-
१) एक बटाटा , मुठभर कोथिंबीर
२) चार मिरच्या , मुठभर खोबरं
३) दीड वाटी उपासाची भाजणी
४) अर्धा चमचा किसलेलं आलं
५) अर्धा चमचा साखर
६) अर्धा चमचा जिरं पूड
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) आलं-मिरची , जिरं , खोबरं , थोडी कोथिंबीर , मीठ , साखर यांचं एकत्र वाटण करावं .
२) बटाट्याची सालं काढून किसून घ्यावा . पाणी टाकून ठेवावा . म्हणजे बटाटा तांबडट होत नाही .
३) उरलेली कोथिंबीर चिरून घ्यावी . हे वाटण आणि कोथिंबीर उपासाच्या भाजणीत घालावी .
४) त्यातच पाण्यातून काढून बटाटा कीस टाकावा . कणकेप्रमाणे पीठ भिजवावं . लिंबापेक्षा जरा लहान गोळे करावेत . प्लास्टिकच्या कागदावर पाण्याच्या हातानं छोटे छोटे वडे थापून तळावेत .