एकत्र व्यायाम

exerciseकुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येऊन खेळीमेळीत वेळ घालवावा, असा सल्ला दिला जातो. दिवसभर आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पण सध्या येण्याच्या वेळा अनियमित असल्यामुळे रात्रीचं जेवणदेखील एकत्र घेणं होत नाही. अशा वेळी सर्व सदस्यांनी एकत्र व्यायाम करणं योग्य उपाय असू शकतो. यानिमित्तानं एकमेकांच्या प्रेरणेनं फिटनेस साधता येईल. त्याचबरोबर एकमेकांबरोबर आवश्यक तो वेळही घालवण्याची संधी मिळेल. अर्थातच सर्वांचे व्यायाम प्रकार वेगवेगळे असतील. वृद्ध ताकद टिकवून ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे लवचिकता टिकवण्यासाठी व्यायाम करतील. लहान मुले उंची वाढवण्यासाठी आणि सशक्तीकरणासाठी व्यायाम करतील. तरुण शरीर पिळदार बनवण्यासाठी परिश्रम घेतील तर महिला शरीराचा डौल राखण्यासाठी व्यायाम करतील. हे काम सर्वांनी एकत्र येऊन हसतखेळत केल्यास सोपं होईल हे नक्की.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *